नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना २८ लाख रूपयांना चूना लावला. फॉरेक्स ट्रेड्रिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिष दाखवत ही आर्थीक फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या जून महिन्यात तक्रारदार व अन्य दोघांशी भामट्यांनी संपर्क साधला होता. सोनिया गुप्ता व तिचे काका नितेश सिंह यांनी वेगवेगळया मोबाईल नंबर व व्हाटसअप कॉलच्या माध्यमातून तिघांना फॉरेक्स ट्रेंडिगची माहिती देवून गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले. यानंतर संबधीताना बनावट फॉरेक्स ट्रेडिंग फ्लॅटफार्मवर खाते ओपन करून देवून ही फसवणुक केली.
या प्रकरणात संशयितांनी वेळोवेळी ट्रेंडिग करण्यास सांगितले. त्यानुसार संबधीतांनी सांगितलेल्या बँक खात्यात व युपीआय खात्यावर तक्रारदारास १२ लाख २३ हजार ४०० तर अन्य दोघांना अनुक्रमे ६ लाख ८० हजार ८०० व ८ लाख ६६ हजार ८०० रूपये अशी रक्कम भरण्यास भाग पाडून तब्बल २७ लाख ७० हजार २०० रूपयांची आर्थीक फसवणुक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पाटील करीत आहेत.