नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला मुलींवरील अत्याचार वाढले असून, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक रमेश कुमार पाल (२१ रा.तिरूपतीनगर दसक) या परप्रांतीयाने परिसरातील विराजनगर भागात राहणा-या परिचीत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून व आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत हे कृत्य केले असून, गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याने मुलगी गर्भवती राहिल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे. मुलीस सोबत घेत पालकांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पोलीस दप्तरी बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दाभाडे करीत आहेत.
विनयभंगाची घटना, गुन्हा दाखल
तर दुसरी घटना विनयभंगाची वडनेर दुमाला येथे घडली. शिवराजनगर येथील रायगड चौकात राहणा-या पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस रेकॉर्डवरील अजय राठोड (५० रा.वडनेर दुमाला ना.रोड) या संशयिताने गेल्या गुरूवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास पीडितेचे घर गाठून मागील भांडणाची कुरापत काढून दाम्पत्यास शिवीगाळ व धमकी दिली. यावेळी संतप्त संशयिताने पीडित दांम्पत्याच्या घरातील वीज मिटर बोर्डमधील वायर तोडून नुकसान करीत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलीस दप्तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बरेलीकर करीत आहेत.