नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अंबड येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात पतीने अगोदर पत्नी स्वाती चेतन माडकर (वय-२७) हिचा ओठणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: पती चेतन नाना माडकर वय-३३ रा. चुंचाळे गाव अंबड याने राहत्या घरातच छताच्या पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चेतन नाना माडकर यांना उपचारासाठी भाऊ राजू माडकर याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. या ठिकाणी डॅा. शिंगे यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणाची अद्याप पर्यंत पूर्ण माहिती समोर आली नाही. या घटनेचा पोलिस तपास करत आहे. कोणत्या कारणातून हा खून झाला व त्यानंतर पतीने आत्महत्या केली याचा शोध पोलिस घेत आहे.
याअगोदर नाशिक जिल्हयात अशाच घटना घडल्या आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
…