नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. सदर मुलीना कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी पोलीस दप्तरी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी गेल्या शनिवार (दि.१६) पासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने पालकांनी पोलीसात धाव घेतली असून तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दुसरी घटना सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडली. रविवारी (दि.१७) सकाळी युवती दिंडोरी येथे मैत्रीणीस भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परत आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून पालकांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
तिसरा प्रकार सातपूर पोलीस ठाणे हद्दीत घडला. औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारी मुलगी शनिवार (दि.१७) पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.