नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्डचा गैरवापर करीत सायबर भामट्यांनी एकास तब्बल सव्वा दोन लाख रूपयांना चूना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्लीप कार्डच्या माध्यमातून परस्पर खरेदी करीत ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजीत चंद्रकांत देशपांडे (रा. आदित्य हॉलजवळ, कैलासनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशपांडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. गेल्या बुधवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास सायबर भामट्यांनी क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती मिळवीत ही फसवणुक केली.
क्रेडिट कार्डचा गैरवापर करीत अज्ञात भामट्यांनी फ्लीपकार्ड अॅप द्वारे तब्बल २ लाख १८ हजार २८९ रूपयांची परस्पर खरेदी केली. देशपांडे यांना याबाबत मॅसेज प्राप्त होताच त्यांनी बँकेशी संपर्क साधल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.