नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, घरासमोर पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत इंदिरानगर पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इकबाल आजीमोद्दीन शाह (रा.एसएन पार्क मदिना लॉन्स मागे,वडाळागाव) यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एके ५६१७ गेल्या रविवारी (दि.३) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. मोटारसायकल चोरीची पहिली घटना पंचवटीतील त्रिकोणी बंगला भागात घडली. साहेबराव खंडूजी गवळी (रा.सुपूत्र सोसा.आयोध्यानगरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गवळी यांची अॅक्टीव्हा एमएच १५ सीआर ५३२१ रविवारी (दि.१०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असताना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत. तर सिडकोतील रविंद्र विश्वनाथ पुजारी (रा.महिंद्रा गेस्ट हाऊस मागे सह्याद्री नगर) यांची मोटारसायकल एमएच १५ एफपी ७०३४ गेल्या शनिवारी (दि.२) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.