नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनी लॅण्डींग बाबत धाक दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल दीड कोटी रूपयांना गंडविले आहे. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात संबधीतांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पंधरवाड्यात संबधीताशी सायबर भामट्यांनी संपर्क साधला होता. मुंबई सायबर क्राईम मधून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी वेगवेगळया मोबाईल क्रमांक, व्हॉटसअप कॉल व चॅटींगच्या माध्यमातून शहरातील दोघांना धमकावित ही फसवणुक केली. नरेश गोयल याच्या मनी लॅण्डीग प्रकरणात दोघांचा थेट संबध असल्याचे भासवून त्यांना अटक होण्याची भिती दाखविण्यात आली. मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड नंबर या प्रकरणातील धागेदोरे सांगण्यात आल्याने भेदरलेल्या दोघांना आर्थिक तपसिल व स्थावर मालमत्ताबाबत माहिती आम्हास द्यावी लागेल असे सांगून भामट्यांनी संबधीताच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमा त्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले.
भामट्यांनी सांगितल्यानुसार या घटनेत फिर्यादीने १ कोटी १३ लाख ३० हजार रूपये तर दुस-या तक्रारदाराने ३३ लाख रूपये वर्ग केले असून दोघांची १ कोटी ४६ लाख ३० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ सुभाष ढवळे करीत आहेत.