नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा एका परिचीताने विनयभंग केला. ही घटना शेवगे दारणा ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुषण कासार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकाच गावातील रहिवासी असून ते एकमेकांचे परिचीत आहे. पीडिता शनिवारी (दि.९) रात्री घरातील कामे आटोपून नेहमी प्रमाणे घासलेल्या भांड्याचे खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर पडली असता ही घटना घडली.
घरापासून ती काही अंतरावर पाणी फेकण्यासाठी जात असतांना संशयिताने तिची वाट अडवित विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.