नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेत सराईत टोळक्याने धारदार शस्त्रांचा धाक दाखवीत व्यावसायीकाच्या गल्यातील ३५०० रूपयांची रोकड हिसकावून घेत परिसरात दहशत माजविली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजीत उर्फ वाज्या जैद शेख (१९ रा. सादीकनगर,वडाळागाव), सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (३३) व तौफिक हसन शहा (रा. दोघे भारतनगर वडाळा पाथर्डीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संबधीतावर वेगवेगळया पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत शकील वसीर अन्सारी (गल्ली नं.११ भारतनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अन्सारी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून ते दिपालीनगर येथील नारायणी हॉस्पिटल भागात हातगाडीवर हा व्यवसाय करतात गुरूवारी (दि.७) रात्री इरर्टीका कार एमएच ३९ जे ३७४३ मधून आलेल्या संशयितांनी व्यवसाय सांभाळणा-या अन्सारी यांच्यासह मुलगा आफताब यास शिवीगाळ करीत दमदाटी केली.
यावेळी संतप्त त्रिकुटाने बापलेकास मारहाण करीत गल्यातील ३ हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली असून. एवढ्यावरच न थांबता टोळक्याने परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी तलवार व कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजविली. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.