नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून एका महिलेस घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लोखंडी पकड डोक्यात मारण्यात आल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एकाच इमारतीतील पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशिला चंद्रे, ममता शेळके, सिमा डोंबरे, वर्षा चंद्रे व अजय चंद्रे अशी महिलेस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत छाया संजय गांगुर्डे (रा.केदार गॅलेक्सी,वृंदावन गार्डन मागे,आयटीआय कॉलनी श्रमिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार गांगुर्डे व संशयित महिला एकाच इमारतीतील रहिवासी असून त्यांच्यात अपार्टर्मेंटच्या लाईट बिलावरून वाद आहे.
गेल्या ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गांगुर्डे या आपल्या घरात एकट्या असतांना संशयित महिलांनी बेकायदा घरात प्रवेश करून शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत एकेने डोक्यात लोखंडी पक्कड मारल्याने त्या जखमी झाल्या असून अधिक तपास हवालदार डिंगे करीत आहेत.