नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल अॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी शहरातील तीघाना एक कोटी रूपयांना चूना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या महिनाभरात वेगवेगळय़ा कारणांनी संपर्क साधत भामट्यांनी हा गंडा घातला असून, फसवणुक झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार शहरातील पुरूषाने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या ८ जुलै ते २ ऑगष्ट दरम्यान भामट्यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला होता. वेगवेगळया मोबाईल क्रमांक धारकांनी वेगवेगळे कारणे सांगून तक्रारदारांना डिजिटल अॅरेस्ट करण्याची धमकी दिली.
यानंतर धाकदडपशा करीत तक्रारदारांना वेगवेगळया बँक खात्यांमध्ये लाखोंच्या रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले असून यात तीन जणांना ९६ लाख २९ हजार २४४ रूपयांना गंडा घातला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.