नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम या सोशल साईटवर संशयिताने सेल्फी फोटो स्टेटस ठेवल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरूख अख्तर अन्सारी (रा.सिन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने सेल्फी काढत तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात संशयिताने सीबीएस बसस्थानक परिसरात मुलीस गाठून दोघांनी काढलेला सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मोटारसायकलवर बसवून सिन्नर येथील एका लॉजवर नेले. या ठिकाणी बळजबरीने बलात्कार केला.
यानंतरही संशयिताने वेळोवेळी भेटण्यास भाग पाडून लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार केला. मुलीने लग्नास नकार देताच संशयिताने इन्स्टाग्राम या सोशल साईडवर स्टेटस ठेवून बदनामी केल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.