नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागातील दारू दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकड चोरून नेली. या घटनेत दोन लाख रूपयांच्या रोकड चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर सोपान गायकवाड (रा.लेजेन्स अपा.श्रध्दा विहार वडाळा पाथर्डी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांचा जेलरोड परिसरातील दसक येथील मातोश्री संकुलात योयो नावाचा वाईन शॉप आहे.
मंगळवारी (दि.५) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दारू दुकानाचे शटर कापून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या भामट्यांनी गल्यातील सुमारे १ लाख ९८ हजार रूपयांची रोकड चोरून नेली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दाभाडे करीत आहेत.