नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा भागात पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेला जुगार अड्डा पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत १९ जुगारींच्या मुसक्या आवळत रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे दीड लाखाचा ऐवज हस्तगत केला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र ठक्कर,वसीम शेख, सुनिल पाटील,सचिन सोनवणे,संतोष मंडलिक,योगेश पाटील,भगतसिंग गायकवाड,सखाराम ढगडे,प्रमोद गोरे,यशवंत गोरे,गणेश शेलार,शफिक शेख,जितेंद्र कास,विजय सुर्यवंशी,आनंद शिंदे,सागर साठे,राम अहुजा,संदिप दोंदे व सागर गाडेकर असे कारवाईत मिळून आलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक सागर परदेशी यांनी फिर्याद दिली आहे.
पाथर्डी फाटा येथील हॉटेल रिगल इन च्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.३) पथकाने छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर जन्नामन्ना नावाचा तिरट व मटका जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातूल रोकड व घटनास्थळावरील सामानासह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ लाख ४० हजार ९८० रूपये किमतीचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला असून अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.