नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी १९ वर्षीय परप्रांतीय प्रवाशास लुटल्याची घटना बिडी कामगार नगर येथील पाट किनारी घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा धाक दाखवित तरूणाच्या खिशातील दोन मोबाईल बळजबरीने काढून घेण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकिल वकिल अन्सारी (मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली अरविजन चॉकलेट कपनी आडगाव) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. अन्सारी रविवारी (दि.३) कैलासनगर भागात राहणाºया आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी अमृतधाम भागात उभा असतांना ही घटना घडली. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन प्रवासी असलेल्या रिक्षास त्याने हात देवून थांबविले. मिर्ची हॉटेल भागात त्याने सोडण्यास सांगितले असता चालकाने बिडी कामगार नगरच्या दिशेने आपले वाहन दामटले.
यानंतर पाट किनारी एका इमारतीसमोर नेऊन तरूणास लुटण्यात आले. परप्रांतीय तरूणास रिक्षाखाली उतरवून देत चालकाने त्याचा पिरगळला तर उर्वरीत दोघानी लाकडी दांडक्याचा धाक दाखवित अन्सारी याच्या खिशातील सुमारे १४ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.