नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- : घरात कुणी नसल्याची संधी साधत ४४ वर्षीय परिचीताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना पाथर्डी गौळाणेरोड भागात घडली असून पोलीसांनी संशयितास अक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजनकुमार गुलाबचंद कहार (रा.एक्सप्रेस इन हॉटेलजवळ,प्रशांतनगर पाथर्डी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत गौळाणे रोडवरील त्रिलोकेश्वर मंदिर परिसरात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता मंगळवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास घरात एकटी असतांना ही घटना घडली.
परिचीताने पीडितेचे घर गाठून हे कृत्य केले. घरात कुणी नसल्याचे साधून त्याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने कुटूंबिय घरी परतल्यानंतर आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत.