नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर नारायणदास वैष्णव (रा.राज्य कर्मचारी सोसा.अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या १५ मे ते २९ जून दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी वैष्णव यांच्या घरात शिरून बेडरूममधील लाकडी बॉक्समधील डब्यात ठेवलेले सुमारे ८ लाख ९६ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.