नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मखमलाबाद नाका परिसरातील जलाराम स्विटस दुकान भागात झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
जिजाबाई कांतीलाल भागवत (रा.विठाई हॉस्पिटल जवळ मखमलाबाद नाका) असे मृत महिलेचे नाव आहे. भागवत सोमवारी (दि.२८) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील जेलाराम स्विटस दुकानासमोरून त्या पायी जात असतांना हा अपघात झाला.
भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार नवनाथ रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पसार झालेल्या वाहनचालकाविरोधात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.