नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) व्यवसाय सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे सात लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे दिले नाही तर हॉटेल चालू देणार नाही अशी धमकी देण्यात आल्याने हॉटेल मालकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रृती नाईक व यतिन नाईक (रा.क्रोमा शो रूम समोर,ज्ञानेश्वरनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशुतोष कृष्णा गडलिंग (रा.गोविंदनगर) या हॉटेल व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. गडलिंग यांचे वडनेर पाथर्डी मार्गावरील क्रोमा शोरूम समोरील ज्ञानेश्वरनगर भागात हॉटेल आहे. संशयित दांम्पत्याच्या बंगल्यास लागून गडलिंग यांचे रॉयल लिस्टो नावाचा बिअर बार असून, या हॉटेलमुळे त्रास होत असल्याचा आरोप करीत दांम्पत्याने ग्राहक व हॉटेल कर्मचा-यांची अडवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हॉटेल सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आम्हाला सात लाख रुपये द्या नाही तर हॉटेल चालू देणार नाही असेही तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.