नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,भद्रकाली व उपनगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.धात्रक फाटा भागातील पंकज रणजितसिंग गिरासे (रा.समर्थ एलिगेन्स अपा. कुबाटा शोरूमजवळ) यांची एमएच ३९ एए ४१९५ मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार निंबाळकर करीत आहेत. दुसरी घटना जीपीओ रोडवर घडली. याबाबत योगेश मधुकर गांगुर्डे (रा.सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गांगुर्डे बुधवारी (दि.२३) जिपीओ रोडवरील अॅक्सीस बँकेत गेले होते. बँक परिसरातील म्हसोबा महाराज मंदिर भागात लावलेली त्यांची एमएच १५ जीडी ०७१२ दूचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार निंबाळकर करीत आहेत.
तिसरी घटना उपनगर येथील इच्छामणी लॉन्स भागात घडली. याबाबत अन्सार सैय्यद हमीद (रा.साईयश अपा.इच्छामणी लॉन्स मागे, उपनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अन्सार सैय्यद यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफएक्स १७०७ गेल्या सोमवारी (दि.२१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.