नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला वर्ग असुरक्षीत असल्याचे चित्र असून, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळय़ा भागात बलात्कार व विनयभंगाच्या घटना घडल्या. परिचीताने लग्नाचे आमिष दाखवत एकीवर बलात्कार केला तर शेजा-याने दुसरीचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार बहिणीच्या मुलास रागावल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मावशीचा अंकीत प्रकाश भवर (रा.पगारे मळा,श्रमनगर) याने विनयभंग केला. हा प्रकार बुधवारी (दि.२३) घडला. सदर मावशी संशयिताच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत सदर मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
बलात्काराचा प्रकार याच भागात घडला. पीडिता २०२३ मध्ये आपल्या वहिणीच्या घरी असतांना अबरार गफार शेख (रा.बडी कब्रस्थान मालेगाव) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. यानंतरही संशयिताने वेळोवेळी सदर कृत्य केले असून संशयिताने पीडितेसह तिच्या आई कडून हात उसनवार घेतलेल्या ३ लाख २० हजार रूपयांची रोकड परत न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार हिवाळे व उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.