नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार्यालय फोडून चोरट्यानी सुमारे सव्वा दोन लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना श्री हरी कुटे मार्गावर घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल मुरलीधर भालेराव (रा.लोखंडेमळा,जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भालेराव एच.डी.बी फायनान्शिअल सर्व्हीसेस प्रा.लि. या कंपनीचे अधिकृत अधिकारी असून, त्यांचे कार्यालय सोपान हॉस्पिटल परिसरातील जेनसिस अपार्टमेंट येथे आहे.
गेल्या बुधवारी (दि.१६) रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या खिडकीची काच फोडून ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसमधील कॅश वॉल्टमध्ये ठेवलेली २ लाख १० हजार २५ रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास जमादार टेमगर करीत आहेत.