नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत आडगाव, मुंबईनाका व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपोवनात राहणा-या निकीता मनोत विसपुते (रा.कपालेश्वरनगर,छत्रपती संभाजीनगररोड) या गेल्या शनिवारी (दि.१९) परिसरातील जनार्दन स्वामी मठ परिसरात गेल्या होत्या. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एचपी ९१६० चोरट्यानी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत. दुसरी घटना पखालरोड भागात घडली. सादिक कलीम शेख (रा.सिन्नरफाटा,चेहडीशिव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
शेख यांची एमएच १५ जेटी ९०१३ मोटारसायकल गेल्या शुक्रवारी (दि.१८) रात्री पखालरोडवरील एन.एस.प्लाझा या बिल्डींगच्या फ्रुट गोडावून पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत. तर प्रतिक जगन्नाथ जाधव (रा.अजिंक्य अपा.गुलमोहर विहार पाईपलाईनरोड) यांची एमएच १५ जीएन ८५०३ मोटारसायकल सोमवारी (दि.२१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.