नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपयांची रोकड लांबविली. ही घटना हिरावाडी परिसरातील रेशीमबंधन लॉन्स भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक सुभाष गोंदे (रा.राजवाडा अंबडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गोंदे बुधवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास हिरावाडी भागात गेले होते. रेशीमबंधन लॉन्स भागात त्यांनी आपली कार एमएच १५ एफएफ १६६७ पार्क केली असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यानी कारची काच फोडून सिटासमोरील ड्राव्हरमध्ये ठेवलेली दीड लाख रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.