नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये फेसबुक या सोशल साईडवर चाईल्ड पोनोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करणा-या संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. यासदर्भात एनसीबीआरकडूने पुराव्यानिशी माहिती सादर करण्यात आल्याने सायबर पोलीस ठाण्यात माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाईल्ड पोर्नाग्राफीच्या विरोधात केंद्राच्या गृह खात्याने कठोर पावले उचलली आहे.
अल्पवयीनांचे वैयक्तिक व न्यूड फोटो व व्हिडीओज प्रसारित करणे कायद्यान्वये गंभीर गुन्हा असून, आतापर्यंत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात ३५ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आता पुन्हा एनसीएमईसी या संस्थेने केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) व विविध राज्यांच्या मदतीने बेपत्ता मुलेमुली आणि लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या पीडित मुलींच्या उद्धाराकरिता मानसेवी काम हाती घेत विविध सोशल मीडिया साईटस, डार्कवेब, फेसबुक, आणि अन्य युआरएलचा अभ्यास करुन संशयित हँकर, सोशल मीडिया युजर आणि अल्पवयीनांसंबंधीचे व्हिडीओ, फोटो चोरीछुप्या पद्धतीने अपलोड करणा-यांवर लक्ष केंद्रीत करुन संशयितांचा ठावठिकाणा, त्यांनी केलेले गंभीर गुन्हे उघड केले आहेत.
यात नाशिकमधील फेसबुकधारक दानिश आणि शेख यासह अन्य संशयितांनी काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलामुलींचे न्यूड फोटो, व्हिडीओ आणि लैंगिक अत्याचारासंबंधीचे डिजिटल कंटेट सोशल मिडियावर अपलोड केले. त्याची माहिती कळताच एनसीएमईसीने एनसीआरबीला दिली. दरम्यान, संशयित नाशिक शहरातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा डेटा पुराव्यांसह गोपनीयरित्या शहर सायबर पोलिसांना पाठविण्यात आली. त्यानुसार हे गुन्हे नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी दिली. यासंदभार्ने सहायक निरीक्षक प्रतिक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. तपास शेख करत आहेत.