नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जीन्याच्या पाय-या उतरत असतांना पायघसरून दुस-या माळयावरून पडल्याने २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
राजकुमार श्रीरामदास वर्मा (रा.जगतापवाडी सातपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. वर्मा गुरूवारी (दि.१७) कॅनडा कॉर्नर भागात गेला होता. मॅग्नम हॉस्पिटल नजीकच्या नवशोध बिल्डींगमध्ये तो कामानिमित्त गेला असता ही घटना घडली. काम आटोपून इमारतीच्या पाय-या उतरत असतांना अचानक पाय घसरल्याने तो दुस-या मजल्यावरून जमिनीवर कोसळला होता.
या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने मालक त्रिभुवन तडव यांनी त्यास तात्काळ सिडकोतील गुरूकृपा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. विनोद चौधरी यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.