नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्रवासी सोडून परतणा-या रिक्षाचालकास गाठत दोघांनी कुठलेही कारण नसतांना बेदम मारहाण केल्याची घटना पंचशिलनगर भागात घडली. बुधवारी (दि.१६) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत भामट्यांनी रिक्षा फोडून मोठे नुकसान केले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेद्र प्रकाश जैत (रा.आरटीओ जवळ,पेठरोड) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. जैत बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानक परिसरातून प्रवासी बसवून पंचशिलनगर भागात सोडण्यासाठी गेले असता ही घटना घडली. प्रवासी सोडून ते पंचशिलनगर येथील दर्गा भागातून रिक्षा घेवून जात असतांना दोघांनी त्यांना गाठले.
कुठलेही कारण नसतांना संशयितांनी जैत यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत जैत जखमी झाले असून एकाने टोकदार वस्तूने रिक्षाची काच फोडून नुकसान केले आहे. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.