नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणातील अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाने वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ चाललेला हा प्रकार थांबविण्यासाठी महिलेने अखेर पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर मारूती ठोंबरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मखमलाबाद शिवारात राहणा-या ३० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित व पीडितेमध्ये प्रेमप्रकरण होते. २००८ मध्ये संशयिताने महिलेचे घर गाठून बळजबरीने अत्याचार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लिल फोटो व व्हिडीओ काढला.
सदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य केले. ३० ऑगष्ट २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान वेळोवेळी ब्लॅकमेल करीत त्याने महिलेवर बलात्कार केला असून, अतिरेक वाढल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मयुरी तुरे करीत आहेत.