नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुभाषनगर भागात असलेले दारू दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात गल्यातील रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित गुलाब ओचानी (रा.मोटवाणी फॅक्टरीरोड,सानेगुरूजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ओचानी यांचे सुभाषरोडवरील कदम बिल्डींग भागात वासवाणी ब्रॅण्डी हाऊस नावाचे दारू दुकान आहे. ओचानी शुक्रवारी (दि.११) रात्री दुकान वाढवून आपल्या घरी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे लोखंडी ग्रील व शटरचा पत्रा वाकवून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील कॉईन व रोकड असा सुमारे दोन लाख रूपये हातोहात लांबविले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.