नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील सराफ दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीरोडवरील योगेश अरविंद उदावंत (रा.चैत्रा अपा.विजयनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उदावंत सराफ व्यावसायिक असून त्यांचे नाशिकरोड येथील गुरूनानक पेट्रोलपंपा समोर उदावंत नावाचे दुकान आहे. गुरूवारी (दि.१०) रात्री ते दुकान वाढवून घरी गेले असता ही घटना घडली.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटरचे कुलूप कापून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी काऊंटरला लावलेल्या सोन्याच्या मुरण्या, चांदीचे देव, मुर्ती पैंजन चांदीचे चैन व सोन्याची पॉलीस असलेले दागिणे असा सुमारे १ लाख ५७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.