नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिलायन्स कंपनीच्या मायजियो डिजीटल स्टोअर या शोरूममधून भामट्यांनी आयफोन चोरून नेला. हा प्रकार लॅमरोड भागात घडला. खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून ही चोरी केली असून या ५० हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविण्यात आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद विजय गामणे (रा.साईराजनगर,चेहडी शिव नाशिक पुणा रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गामणे लॅमरोड येथील देवळाली प्लाझा या इमारतीत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या मायजियो डिजीटल स्टोअर्सचे कामकाज बघतात.
मंगळवारी (दि.८) सकाळच्या सुत्रात हा प्रकार घडला. खरेदीच्या बहाण्याने शोरूममध्ये शिरलेल्या अज्ञात चोरट्याने कर्मचा-यांचे लक्ष विचलीत करून काऊंटरवर ठेवलेला सुमारे ५० हजार रूपये किमतीचा आयफोन चोरून नेला. अधिक तपास हवालदार सिध्दपुरे करीत आहेत.