नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर व परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अमृतधाम भागातील अनंत प्रभाकर नवले (रा.श्याम अपा,शुभमंगल कार्यालय, बळी मंदिराजवळ) यांची अॅक्टीव्हा एमएच १२ पीजी ९४४७ गेल्या बुधवारी (दि.२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. भाऊपाटील निंबा शेवाळे (रा.कामटवाडा,अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेवाळे गुरूवारी (दि.३) दुपारी सिडकोत राहणा-या नातेवाईकास भेटण्यासाठी गेले होते. पवननगर मटण मार्केट भागातील जे.एस.बेकर्स येथे लावलेली त्यांची एमएच ४१ आर ४०३६ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देसले करीत आहेत.
तिसरी घटना चेहडी पंपीग भागात घडली. त्र्यंबक बयाजी पाळदे (रा.बेलतगव्हाण चेहडीरोड नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाळदे गेल्या २३ जुलै रोजी सिन्नर फाटा भागातील चेहडी पंपीग येथे गेले होते. अह्येन्यू सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ इआर ४४८४ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.