नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने युवतीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नास नकार दिल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ सय्यद (रा.कॉलेजरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून त्यांचे प्रेमप्रकरण होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवत त्र्यंबकरोडवरील तळेगाव फाटा भागात घेवून जात युवतीवर लॉजिंगमध्ये वेळोवेळी बलात्कार केला.
यानंतर तरूणीने लग्नासाठी आग्रह धरला असता संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.