नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटवर काम करीत असतांना तोल जावून उचावरून पडल्याने २० वर्षीय परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबाद परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजय भाटीया पावरा (रा.जैतपुरा,बडवाणी मध्यप्रदेश) असे मृत मजूराचे नाव आहे. अजय पावरा गेल्या १८ मे रोजी मखमलाबाद शिवारात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईक्रिन या बहुमजली इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली. उचांवर बिगारीचे काम करीत असतांना अचानक तोल जावून पडल्याने तो जखमी झाला होता.
अन्य मजूरांनी त्यास तात्काळ व्हिजन हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यानंतर त्यास मध्यप्रदेशातील इंदोर येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.