नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे एकाने पाच लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. दवाखाना बंद करण्याची धमकी दिल्याने डॉक्टरने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजुम मकराणी असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत डॉ. देवेंद्र निवृत्ती खैरणार (रा.गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. खैरणार यांचा हिरवेनगर येथील समराई सोसायटीत फोर्च्युन नावाचा दवाखाना आहे. गेल्या २४ जून रोजी संशयिताने दवाखाना गाठून डॉक्टर खैरणार यांची भेट घेत हॉस्पिटल बाबत तक्रारी असल्याचे सांगून पाच लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र डॉक्टरांना त्यास थारा दिला नाही.
त्यामुळे संशयिताने पुन्हा पाच सहा दिवस संपर्क साधत खंडणीची मागणी करीत दवाखाना बंद करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.