नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आनंदवली भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात १ लाखाची ४० हजाराची रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय वाल्मिक आहेर (रा.नक्षत्र लॉन्सजवळ पाईपलाईनरोड आनंदवली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर यांच्या आई राहत असलेल्या नवश्या गणपती जॉगिंग ट्रॅक भागातील बंगल्यात ही घरफोडी झाली. आहेर यांच्या आई दि.२७ ते ३० जून दरम्यान मुलाच्या घरी गेल्या असता अज्ञात चोरट्यानी बंद बंगल्याचा फोल्डींग दरवाजाचे टॉवर बोल्ट तोडून ही चोरी केली.
घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचे दागिणे असा सुमारे १ लाख ५५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीराम पाटील करीत आहेत.