नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने शहरातील एका नोकरदारास सायबर भामट्यांनी तब्बल साडे सतरा लाख रूपयांना गंडविले. अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवत भामट्यांनी ही फसवणुक केली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जत्रा हॉटेल परिसरातील नांदूर लिंक रोड भागात राहतात. गेल्या ऑगष्ट महिन्यात त्यांना व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या ग्रुपमधील प्रणिता जोशी नामक महिलेने ९३७४१७९६०२ या क्रमांकावरून संपर्क साधत त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करून नफा कमविण्याचे आमिष दाखविले.
तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात यश आल्याने भामट्या महिलेने त्यांना वेळोवेळी वेगवेगळया बँक खात्यांमध्ये १७ लाख ५० हजाराची रोकड भरण्यास भाग पाडले असून अधिक तपास सायबर पोलीस करीत आहेत.