नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अशोकनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत रण्यात आले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेखर तुकाराम गवळी, सुधीर गोविंदराव शिंदे, अजय मोतीलाल पाराशेरे,दिपक अशोक पगार, अनिल साहेबराव खरात, मनोज उमेदसिंग देशमुख व युवराज उत्तम पाटील अशी पोलीसांनी कारवाई केलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार भुषण शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे. अशोकनगर येथील ब्रँण्डीं हाऊस समोरील मोकळया जागी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने सोमवारी (दि.३०) सायंकाळी छापा टाकला असता संशयित पत्र्याच्या शेडमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ३ हजार २०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.