नाशिक (इंडिया दर्पणण वृत्तसेवा)– पत्र्याच्या शेडमध्ये बसून अमली पदार्थाचे सेवन करणा-या आठ जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई वडाळारोडवरील डीजीपीनगर भागात करण्यात आली. या ठिकाणाहून अमली पदार्थ व सेवन करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असद जाकिर सय्यद (रा.डीजीपीनगर,कॅनलरोड),शहबाज गुलाम शेख (रा.नागजी मुंबईनाका),साहिल नवाज सय्यद (रा.वडाळागाव),शादाब सलीम शेख (रा.वडाळागाव),जुबेर मोहम्मद हनीफ मन्सुरी (रा.मदिनानगर,वडाळागाव), मुदतसर जाकिर सय्यद (रा.डीजीपीनगर कॅनलरोड), शाबुद्दीन नवाज शेख (रा.सादिकनगर वडाळागाव) व हसन ताहिर पटेल (रा.साईनाथनगर,वडाळा पाथर्डीरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नशेलींची नावे आहेत.
याप्रक्रणी अंमलदार अनिल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. वडाळारोडवरील डीजीपीनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजा या अमली पदार्थाचे सामुहीक सेवन केले जात असल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास पथकाने छापा टाकला असता संशयित गांजा ओढतांना मिळून आले. या ठिकाणाहून गांजाच्या पुड्या,रिझल पेपर,सिगारेट व चिलम असा सुमारे ३९१ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास पावरा करीत आहेत.