नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर येथील प्रबुध्दनगर भागात उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयित पत्यांच्या कॅटवर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. घटनास्थळावरून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रितम किसन मांजरे (रा.महालक्ष्मीचौक,प्रबुध्दनगर), राजू दत्तू दुसाने (रा.शाहूनगर सिडको), परमेश्वर हरिभाऊ गायकवाड (रा.आंबेडकर चौक,प्रबुध्दनगर), ज्ञानेश्वर गणपत कांबळे (रा.रोहिदास चौक प्रबुध्दनगर) व भगवान जिवला चौधरी (रा.साईबाबा मंदिराजवळ,ध्रुवनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत.
याबाबत अंमलदार रविंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. प्रबुध्दनगर येथील नंदिनी हॉटेलच्या भिंतीलगत काही लोक जुगार खेळत असल्याची महिती सातपूर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास पथकाने धाव घेत संशयितांना बेड्या ठोकल्या. संशयित टोळके या ठिकाणी पत्यांच्या कॅटवर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. घटनास्थळावरून २ हजार ३० हजार रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.