नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लहान मुलास सोबत घेवून परिसरात फेरफटका मारणा-या विवाहीतेचा दुचाकीस्वाराने विनयभंग केला. हा प्रकार राणाप्रताप चौक परिसरात घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती बुधवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास परिसरातील गजानन क्लास भागात लहान मुलास सोबत घेवून फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली.
दुचाकीवर आलेल्या या तरुणाने महिलेचा विनयभंग केला. यावेळी नजीकच्या तरूणीने त्यास टोकले असता त्याने घरावर दगड फेकून गायब करून टाकेन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
………
दीड लाखाचे अलंकार चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यानी कपाटातील सुमारे दीड लाखाचे अलंकार चोरून नेले. ही घटना देवळाली कॅम्प येथे घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता अशोक पगारे (रा.देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि.१० ते २६ जून दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून बेडरूमधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५६ हजार ९८० रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.