नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ३१ वर्षीय परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना जुना गंगापूरनाका भागातील चोपडा लॉन्स परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्याम कृष्णा भगत (मुळ रा.बोहरा हाथ जि. गोपालगंज हल्ली विकास कॉलनी गौतमनगर सातपूर ) असे मृत कामगाराचे नाव आहे. श्याम भगत हा मजूर गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास जनकल्याण रक्तपेढी परिसरात नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. सहाव्या मजल्यावर नेहमी प्रमाणे काम करीत असतांना अचानक पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली.
या घटनेत भगत सहाव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झाले होते. अन्य कामगारांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हवालदार बागुल करीत आहेत.