नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इंटरनॅशनल कंपनीत व्यवसाय करीत असल्याचे भासवून भामट्यांनी एकास सव्वा दोन लाख रूपयांना गंडा घातला आहे. व्यवसायातून मिळणा-या मोठ्या मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणुक करण्यात आली असून, गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याने भामट्यांनी तक्रारदाराच्या नावे परस्पर ऑनलाईन कर्ज काढून रक्कम हडप केली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद निवृत्ती कोळपे (रा.शिवाजीनगर सातपूर) व प्रज्ञेश प्रविण शिंदे (रा.सहदेवनगर, गंगापूररोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रतिक पांडूरंग सुर्यवंशी (रा.सहदेवनगर,गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयितांनी गेल्या जानेवारी महिन्यात सुर्यवंशी यांना गाठून विहान क्यूनेट या इंटरनॅशनल कपनीत व्यवसाय करीत असल्याचे भासवून सुर्यवंशी यांना नमुद कंपनीत बिझनेस जॉईट केल्यास त्यात तुझा मोठा आर्थीक फायदा होईल असे प्रलोभन दाखविले.
यावेळी कंपनीची स्टार्टअप कॉस्ट मधून संशयितांनी अडिच लाख रूपये भरणा करण्याचा सल्ला दिला. यावेळी सुर्यवंशी यांनी संध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता या दुकलीने मनीह्यूव अॅप व रिंग अॅप वरून सुर्यवंशी यांच्या नावे परस्पर काढले. या रकमेतील दोन लाख रूपये संशयित कोळपे यास ऑॅनलाईन व पंधरा हजार रूपये रोखीने दिले. मात्र संशयितांनी कुठलेही प्रोडक्ट दिले नाही. सुर्यवंशी यानी केलेल्या चौकशीत हा व्यवसाय एमएलएम बेस असल्याचे समोर आल्याने त्यांनी पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास निरीक्षक अतुल डहाके करीत आहेत.