नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मानसिक रूग्ण असलेल्या काकूवर पुतण्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लॅकमेल करीत कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगीक वसाहतीतील गंगासागर नगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून ते एकाच भागात राहतात. पिडीता मानसिक अजाराने त्रस्त असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी ती गोळया घेवून झोपलेली असतांना सशयित पुतण्या तिच्या घरी आला. घरात कुणी नसल्याची व काकू झोपलेली असल्याची संधी साधत पिडीतेच्या असाह्यतेचा त्याने फायदा उचलला. गोळयांच्या धुंदीत झोपलेल्या काकूवर त्याने बलात्कार केला. सावरलेल्या पिडीतेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने याबाबत वाच्यता केल्यास कुंटूबियांस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतरी त्याने ब्लॅकमेल केले. वारंवार पुतण्याचा अत्याचार सहन करणाºया काकूस बुधवारी (दि.२५) संशयिताने मोबाईलवर संपर्क साधत शरिर संबध ठेवले नाही तर कुटूंबियास मारून टाकेन अशी धमकी दिल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आर.आर.पठाण करीत आहेत.