नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यास काळीमा फासणारी घटना नाशिक शहरात घडली. रोजगारानिमित्त शहरात राहणा-या परप्रांतीय भावाने विवाहीत चुलत बहिणीवर बलात्कार केला आहे. मेव्हणा घरात नसल्याची संधी साधत निर्दयी भावाने धारदार ब्लेडचा धाक दाखवित हे कृत्य केले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोजगारानिमित्त शहरात दाखल झालेले परप्रातीय पीडिता व संशयिताचे कुटुंबिय संत कबिर नगर भागात वास्तव्यास आहे. मिळेल ते काम करून दोन्ही कुटुंबिय आपला उदनिर्वाह करतात. गेल्या मार्च महिन्यात पीडितेचा पती कामावर गेले असता ही घटना घडली. पीडिता घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्या मोठ्या काकाच्या २२ वर्षीय मुलाने घरात प्रवेश करून पीडितेचे तोंड दाबून दमदाटी करीत बलात्कार केला.
दोन कुटुंबियात वाद नको म्हणून महिलेने याबाबत वाच्यता केली नाही मात्र त्यानंतरही गेल्या १६ मे रोजी सकाळच्या सुमारास संशयिताने घरात घुसून धारदार ब्लेडचा धाक दाखवित बळजबरीने पुनर्रावृत्ती केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. महिलेने आपल्या पतीकडे आपबिती कथन केल्याने दोघांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.