नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने भारत नगर भागातून संशयितास हुडकून काढले असून त्यास सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. नासिर खलील शेख (२५ रा. गल्ली नं.१० वडाळारोड भारतनगर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सिडकोतील पीडित महिला रविवारी (दि.२२) रात्री संशयिताच्या अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. स्टेट बॅक चौकातून महिला संशयिताच्या रिक्षात बसली होती.
पीडिता एकटी असल्याची संधी साधत तिच्याशी अश्लिल वर्तन केले. यशवंत व्यायामशाळा भागात संशयिताने रिक्षा थांबवून तिचा विनयभंग केला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठांनी गंभीर दखल घेतल्याने व युनिटचे हवालदार विशाल काठे आणि अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितास हुडकून काढण्यात यश आले आहे. संशयिताच्या भारतनगर येथील दर्गा भागात मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार विशाल काठे, प्रविण वाघमारे,प्रशांत काठे, प्रदिप म्हसदे,संदिप भांड,विशाल देवरे,मिलींदसिग परदेशी,रमेश कोळी धनंजय शिंदे, मुक्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे व गोरक्ष साबळे आदींच्या पथकाने केली.