नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलिसाने सहा वर्षीय मुलीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल गायकवाड (३४) असे पोलिसाचे नाव असून ते नाशिकरोड येथील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देतांना सांगितले की, पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड याचे पत्नीसोबत वाद होत असल्याने त्यांनी काही दिवसापूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ही घटना घडली.
स्वप्निल गायकवाड या सहा वर्षाची मुलगी भैरवीला अगोदर गळफास देत तिचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.