नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयित रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
सिडकोतील महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२२) रात्री महिला मेनरोड भागात येत असतांना हा प्रकार घडला. स्टेट बॅक चौकातून महिला एका रिक्षात बसली होती. प्रवासात अनोळखी रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लिल वर्तन केले.
रात्रीची वेळ असल्याने पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र यशवंत व्यायामशाळा भागात संशयिताने रिक्षा थांबवून तिचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.