सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

by India Darpan
जून 23, 2025 | 5:01 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोलीसांनी रात्रीच्या गस्तीवर असतांना रविवारी रात्री वेगवेगळया भागात मोठी कारवाई केली. चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव येथील वसीम नसीर खान (३४ रा.उंदीरखेडे ता. पारोळा) यास दुधबाजारातील जुने पाकिजा कलेक्शन भागात रात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या. संशयिताच्या अंगझडतीत घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले असून याप्रकरणी अंमलदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

दुसरी कारवाई सरदार चौकात करण्यात आली. श्रोहितबैतू राऊत (२५ रा.वाळीपाडा ता.हरसूल) हा युवक मध्यरात्री सरदार चौकातील तांबोळी पान स्टॉल भागात मिळून आला. याप्रकरणी अंमलदार परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत. तिसरी कारवाई तपोवनातील चव्हाणनगर भागात करण्यात आली. योगेश पदमसिंग राठोड (१९ रा.मोरगावताडा ता.जामनेर जि.जळगाव) हा मोदी ग्राऊंडसमोरील त्रिवेणी अपार्टमेंट भागात मिळून आला. याबाबत अंमलदार गुंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुरजे करीत आहेत.

चौथी कारवाई देवळाली गाव येथील सुंदरनगर भागात करण्यात आली. मोती मगल कार्यालय परिसरात विकास राजू साळवे (रा.रोकडोबावाडी देवळालीगाव) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याबाबत अंमलदार कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत. पाचवी कारवाई सातपूर औद्योगीक वसाहतीतील व्हिक्टर पॉईंट भागात करण्यात आली. या ठिकाणी विशाल कन्हैय्या सिंग (रा.श्रमिकनगर) व साहिल संजय शर्मा (रा.विश्वासनगर,सातपूर) हे दोघे संशयास्पद मिळून आले. याप्रकरणी अंमलदार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.

सहावी कारवाई चुंचाळे शिवारातील पाटील पार्क भागात करण्यात आली. या ठिकाणी विशाल अशोक जाधव (२६ रा.म्हाडा,अंबड) हा संशयास्पद मिळून आला. याप्रकरणी शिपाई खैरणार यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत. सातवी कारवाई सिडकोत भागात करण्यात आली. कृष्णा संतोष दळवी (२१ रा.मुथूट फायनान्स जवळ उपेंद्रनगर) व यश वसंत रणधीर (२० रा. गोपाळ चौक कामटवाडा) हा पोलीस रेकॉर्डवरील संशयित शनिवारी रात्री अनुक्रमे पवननगर स्टेडिअम व अश्विननगर येथील महिद्रा हाऊस भागात मिळून आले. याबाबत अंमलदार राठोड व सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार देशमुख व जमादार शिरसाठ करीत आहेत.

तर रितेश संजय जगताप (रा.श्रमिकनर सातपूर) व अथर्व राजा धनगर (१९ रा.वैदूवाडी, आगरटाकळी) हे दोघे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोपाळ पार्क बिल्डींग परिसरात मिळून आले. याबाबत अंमलदार राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हायची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. तसेच सागर पंडीत बांगर (२२ रा.आयटीआय सिग्नल गौतमनगर) हा ठक्कर बाजार परिसरातील रूची पान स्टॉल भागात संशयास्पद मिळून आला. याबाबत अंमलदार ससाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

Next Post

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

India Darpan

Next Post
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

ताज्या बातम्या

Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011