सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

by India Darpan
जून 16, 2025 | 5:07 pm
in क्राईम डायरी
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, वेगवेगळया भागात नुकत्याच चार घटना घडल्यात. त्यात दोन अल्पवयीन मुलींसह महिलाचा परिचीतांनी विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ गंगापूर,इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विनयभंगाचा पहिला प्रकार मखमलाबाद येथील शांतीनगर भागात घडला. रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास बिल्डींगच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या भावास पाणी देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इमारतीत राहणा-या विशाल गुंजाळ नामक युवकाने विनयभंग केला. पाणी देवून जिन्याने घराकडे जाणा-या मुलीस आपल्या घरात ओढून घेत संशयिताने मुलीचा विनयभंग केला. यावेळी त्याने वाच्यता केल्यास आईस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पीडितेच्या आईन संशयितास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्याने मुलीच्या आईने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.

दुसरा प्रकार औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडला. पीडित महिला आपल्या घरात एकटी असता अमोल खोतकर नामक संशयिताने पाठीमागील दाराने बळजबरीने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. पीडित महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला शिवीगाळ करीत बांबूच्या काठीने मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.

तिसरी घटना फाळके स्मारक भागात घडली. छेड काढण्याच्या वादातून कुटुंबिय मारहाण करीत टोळक्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. शहरातील कुटूंबिय शनिवारी (दि.१४) फाळके स्मारक भागात फिरण्यासाठी गेले होते. पांडवलेणींसह फाळके स्मारकात फेरफटका मारून सायंकाळच्या सुमारास कुटूंबिय आपल्या वाहनांजवळ आले असता ही घटना घडली. वाहन पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या टोळक्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली त्यामुळे पालकांनी संबधीतांना जाब विचारला असता संतप्त तीन ते चार जणांच्या टोळक्याने मुलीचा विनयभंग करीत कुटूबियास बॅटने मारहाण केली. या घटनेत दोन महिलांच्या गळयातील सोन्याच्या अलंकार तुटून नुकसान झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

चौथी घटना जेलरोड भागात घडली. नणंदच्या घरी वडिलोपार्जीत इस्टेटीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या महिलेचा पुतण्याने विनयभंग केला. महिला व तिचे कुटुंबिय रविवारी (दि.१५) लोखंडे मळा भागात राहणा-या आपल्या नणंदच्या घरी गेली होती. वडिलोपार्जीत शेती व जुने घर वाटणीचा वाद सुरू असतांना पीडितेच्या पुतण्याने तिचा विनयभंग केला. या घटनेत संशयितानी पीडितेच्या पतीसह मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पूल पूर्णपणे बांधलेला, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता…महेश झगडे यांची पोस्ट चर्चेत

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

Next Post
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

ताज्या बातम्या

Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
rape

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011